नांदेड(प्रतिनिधी)-वेडींग इंव्हीटेशन कार्ड असे एपीकेचे एक निमंत्रण पत्र प्रसारीत होत आहे. परंतू हा व्हायरस आहे. जनतेने अशा कोणत्याही कार्डला ओपन करू नये. जने करून त्यांचे काही आर्थिक नुकसान होईल हा हॅकींगचा एक नवीन प्रकार आहे असे संदेश वाचकांनी त्वरीत प्रभावाने डिलिट करावे यासाठी आम्ही हा शब्दप्रपंच केला आहे.
सध्याच्या तंत्रज्ञान युगात तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच फसवणूकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत. त्याचा फटका जनतेला मोठ्या आर्थिक स्वरुपात भोगावा लागत आहे. आर्थिक त्रास झाल्यामुळे कौटूंबिक अडचणी होत आहेत. यासाठी शासनाने सुध्दा पोलीस विभागात सायबर विभाग सुरू केला आहे. परंतू तरी पण नवनवीन माध्यमाने हॅकींग करून आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकार घडत आहेत.
आमच्या एका वाचकाने आम्हाला पाठविलेल्या संदेशानुसार त्यात इंग्रजी आणि हिंंदीमध्ये संदेश लिहिलेला आहे आणि सोबतच त्याच्याखाली वेडींग इंव्हीटेशन कार्ड एपीके स्वरुपात आहे. आम्ही तो संदेश वाचकांच्या माहितीसाठी प्रसारीत करत आहोत. ज्या संदेश असे लिहिले आहे की, आपले स्वागत आहे. आपण विशेष रुपाने आमंत्रित आहात. 10 ऑक्टोबर 2025 रोजी प्रेम अशी चाबी आहे जी आनंदाचे दरवाजे उघडते आणि त्याच्या खाली ते इंव्हीटेशन कार्ड आहे.आता या इंव्हीटेशनकार्डमध्ये काय आहे याची तर माहिती आम्हालाही नाही परंतू हे इंव्हीटेशन कार्ड उघडल्यानंतर तुमचा मोबाईल हॅक होईल आणि त्यातून पुढे तुमचा बॅंक खात्याशी ती हॅकींग जोडली जाईल आणि तुमचे आर्थिक नुकसान होईल म्हणून वास्तव न्युज लाईव्ह वाचकांना ही विनंती करत आहे की, अशा पध्दतीचे कार्ड ओपन करू नका आणि आपल्या हातानेच आपली फसवणूक करून घेवू नका.
व्हाटसऍपवर आलेला असा संदेश उघडू नका नाही तर फससाल
