नांदेड (प्रतिनिधी)-महाराष्ट्रासह मराठवाड्यात देखील अतिवृष्टी होऊन शेतकरी यांच्या शेतातील पिके उध्वस्त झाल्याने बळीराजा संकटात सापडला असताना नांदेड जिल्ह्यामध्ये देखील अतिवृष्टी झाली आहे.
मागील अनेक दिवसापासून सतत धार पाऊस पडत असल्याने ढग फुटी होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली असल्याने पिकाचे नुकसान झाले आहे, शेतकऱ्याची आर्थिक स्थिती बिकट झाली असल्यामुळे मुलांचे शालेय फीस व परीक्षा शुल्क भरण्याची परिस्थिती राहिलेली नाही.
सध्या ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.जनतेचेच्या घरात पाणी शिरले, त्यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूच नुकसान झाले, त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.
त्यामुळे शालेय फीस व परीक्षा शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. पूर परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांचे शालेय फीस व परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
