नांदेड(प्रतिनिधी)- आज सायंकाळी 6 वाजता कै.डॉ.शंकरराव चव्हाण विष्णुपूरी जलाशयातून 3 लाख 21 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सोबतच जायकवाडी प्रकल्पातून 3 लाख 6 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नांदेडपर्यंत पोहचलेला आहे. त्यामुळे नांदेडमधील विसर्गाचा वेग वाढवावा लागणार आहे. तो 3 लाख 50 हजार क्युसेक्सपर्यंत जावू शकतो अशी माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिली.
मागील 30-40 तासांपासून बंद आहे. परंतू जायकवाडी प्रकल्पातून होणारा पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि नांदेडमधून सुध्दा त्याच प्रमाणे विसर्ग करावा लागणार आहे. पुररेषेत राहणाऱ्या अनेक जणांना प्रशासनाने सुरक्षीत स्थळी हालविले आहे. गरज पडली तर अजूनही काही लोकांना हालवावे लागले तर प्रशासन त्यासाठी सज्ज आहे. नांदेड जिल्ह्याखाली तेलंगणा राज्यात असलेल्या पोचमपाड येथील श्रीराम प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांसोबत आमचा समन्वय काम आहे आणि त्यांच्याशी सुध्दा आम्ही कायम संपर्कात आहोत. विष्णुपूरी प्रकल्पातील एक दरवाजा काही तांत्रीक कारणामुळे चार वर्षापसून बंदच आहे. त्याची दुरूस्ती लवकरच करून घेवू. मी फिरत असतांना माझ्या हे लक्षात आले की, शहरातून कोठे पाण्याला जिरण्यासाठी जागा करून तरीपण तशी जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे शहराच्या परिस्थितीसाठी कायम स्वरुपी योजनेची आखणी करावी लागणार आहे. आमच्या येथे पुररेषेतील लाल आणि हिरव्या भागात सुध्दा बांधकाम झालेले आहे. तो अतिक्रमणाचा विषय आहे. त्यासंदर्भाने सुध्दा काही करता येईल काय हे मी पाहणार आहे. जनतेने पाण्याचा विसर्गाचा वेग लक्षात घेता सुरक्षीत स्थळीच राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले आहे.
रात्री विष्णुपूरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढू शकतो-राहुल कर्डीले
