नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासन काय करू शकते याचे एक उदाहरण समोर आले आहे. आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेचे विलिनीकरण मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान यामध्ये केल्याचा शासन निर्णय ग्राम विकास विभागाने जारी केला आहे. या निर्णयावर ग्राम विकास विभागाचे सहसचिव कालू वळवी यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.
राज्यात आर.आर.पाटील गृहमंत्री असतंाना त्यांनी आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना तयार केली होती. पण आता 29 जून 2025 च्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्राम पंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या स्तरावरून केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजना अधिक गतीमान कारकरित्या राबविण्यासाठी स्पर्धा व्हावी यासाठी राज्य, महसुली विभाग, जिल्हा व तालुका अशा चार स्तरांवर लोकांना स्वयंस्पुर्तीने सहभागी करून घेण्याकरीता मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आर.आर(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान या योजनेत विलीन करण्यात आली आहे. या शासन निर्णयामध्ये दुसऱ्या कोणत्याही योजनेचे विलीनीकरण नमुद नाही. म्हणजे आर.आर(आबा) पाटील यांचे नाव योजनेतून कमीच करण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे.
आर.आर.(आबा) पाटील यांचे नाव जनतेच्या स्मृतीतून जावे म्हणून योजनेचे नाव बदलले
