महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकॅडमीचे पुरस्कार जाहीर.
नांदेड:- महाराष्ट्र ऊर्दू साहित्य अकॅडमी मुंबई च्या वतीने दिला जाणार उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार व दै कामील यकीन तथा दै फोर्थ अंपायर चे संपादक मोहम्मद सादिक यांना जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकॅडमी च्या वतीने दर वर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात येते. सन २०२१ साला साठी अल्पसंख्यक मंत्रालय यांच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार येणाऱ्या ७ ते ८ ऑक्टोबर दरम्यान मुंबई येथे होणाऱ्या भरगच्च कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पत्रकार मोहम्मद सादिक हे मागील ४० वर्षा पासून पत्रकार या क्षेत्रात कार्यरत आहेत.
