नांदेड (प्रतिनिधी )–क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे 1 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 2025-2026 जिल्हास्तरीय शालेय रायफल शूटिंग क्रीडा स्पर्धेचे नांदेड येथे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत प्रथमच राजर्षी श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालयाच्या संघाने सहभाग घेऊन घवघवीत यश संपादन करत जिल्ह्यात आपला विजयाचा दबदबा कायम ठेवला आहे या विद्यालयाचा विद्यार्थी पार्थ मनोज कुमार कलवले याने अचूक असा निशाणा साधत “एक गोली एक दुश्मन” या वाक्याप्रमाणे यु-पिस्तुल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत विभागीय पातळीवरील स्पर्धेत स्थान मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या यशाबद्दल संस्थेचे संचालक शरोहित देशमुख,प्राचार्य गिरीश आलूरकर,ॲडमिन ऑफिसर संतोष कल्लेवार व त्यांचे प्रशिक्षक,माजी सैनिक गणेश कळकेकर,टीम मॅनेजर एकनाथ पाटील,सतीश चुन्नमवार व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.
पार्थ मनोजकुमार कलवले या विद्यार्थ्याने यु पिस्तूल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावत विद्यालयाचे व आई-वडिलांचे नावलौकिक केल्याने त्याचे सर्व स्तरातून जिल्हाभर कौतुक होत आहे.
