नांदेड(प्रतिनिधी)-उमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दुहेरी खून प्रकरणात 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
2019 मध्ये 7 जुन रोजी गोरठा ता.उमरी येथे दोन कुटूंबात भांडण झाले. त्यात गुन्हा क्रमांक 74 आणि 77 असे परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले. एका गुन्ह्याचा तपास धर्माबाद उपविभागाचे तत्काली सहाय्यक पोलीस अधिक्षक नुरूल हसन यांनी केला. एका गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक इंद्राळे यांनी केला. या दोन्ही प्रकरणाचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. यातील एका गुन्ह्यातील आरोपी पुंडलिक विश्र्वंभर भरकड रा.गोरठा यास 10 वर्ष सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये रोख दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. दुसऱ्या गुन्ह्यात माणिकराव बालाजी सावंत यांना 10 वर्ष सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये रोख दंड तसेच शंकर दिगंबर भरकड, पांडूरंग दिगंबर भरकड, दत्ताजी बालाजी सावंत, गुणाजी बालाजी सावंत या चौघांना चार वर्ष सक्तमजुरी आणि 2500 रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोहम्मद नासीर मोहम्मद सलीम यांनी हा निर्णय दिला. या खटल्यांमध्ये सहाय्यक सरकारी अभियोक्ता ऍड. अनुराधा रेड्डी (डावकर) यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. पोलीस उपनिरिक्षक कांबळे यांनी या प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. पोलीस अंमलदार श्रीनिवास नाईनवार आणि दिगंबर शितळे यांनी पैरवी अधिकाऱ्याचे काम केले.
परस्पर विरोधी खून प्रकरणांमध्ये 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा
