देगलूर(प्रतिनिधी)-देगलूर येथील बेस काझी गल्लीमध्ये चोरट्यांनी एक घर फोडून 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे.
कर व्यवसाय करणारे सय्यद असद अली सय्यद मकबुर अली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19 सप्टेंबर रोजी त्यांच्या घराच्या पाठीमागील लोखंडी दरवाज्याचा कडीकोंडा काढून कोणी तरी चोरटा मुख्य हॉलमध्ये आला आणि कपाटात प्लॅस्टीकच्या डब्यात ठेवलेले त्यांच्या वहिणीचे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनीमंगळसुत्र चोरून नेले आहे. देगलूर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 473/2025 दाखल केला असून प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरिक्षक श्रीमती बेंबडे अधिक तपास करीत आहेत.
देगलूरमध्ये 50 हजारांची घरफोडी
