भोकर :- केंद्र शासन व राज्य शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी सूचित केल्या नुसार माता व बालकांची आरोग्य तपासणी ” स्वस्थ नारी, सशक्त परिवार ” अभियान अंतर्गत आरोग्य शिबीर नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ. राजाभाऊ बुट्टे यांच्या मार्गदर्शना नुसार ग्रामीण रुग्णालय भोकर येथे दि. २५ सप्टेंबर रोज गुरुवारी आयोजित करण्यात आला आहे. या आरोग्य शिबीरास प्रमुख उपस्थिती भोकर विधानसभा मतदारसंघाचे महिला आमदार मा.श्रीजयाताई अशोकराव चव्हाण, उप विभागीय अधिकारी श्री प्रविण मंगशेट्टी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, तहसीलदार गुंडमवार आदी मान्यवर यांची उपस्थिती राहणार आहे अशी माहिती ग्रामीण रुग्णालय भोकरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रताप चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश जाधव यांनी दिले.
या आरोग्य शिबिरात महिलांची रक्तदाब, मधुमेह, दंत रोग, नेत्र रोग, स्तन व गर्भाशय, मुख व मुख कर्क रोग तपासणी, गरोदर महिलांसाठी लसीकरण सेवा, हिमोग्लोबिन तपासणी, क्षय रोग तपासणी, सिकलसेल आजार, रक्तक्षय तपासणी, पोषण आहार मार्गदर्शन, मानसिक आरोग्य मार्गदर्शन, आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड काढणे, अवयवदान नोंदणी, रक्तदान शिबीर, लहान बालकांची तपासणी विशेष तज्ञ डॉक्टर यांच्या कडून तपासणी करण्यात येणार आहे.
भोकर शहर व परिसरातील महिला व बालकांनी सहभागी होऊन आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन भोकर आरोग्य विभागाने केले आहे.
