दोन लुटमारीच्या घटना : चाकूचा धाक दाखवत दुचाकी व मोबाईल लंपास

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्यात एकाच दिवशी दोन लुटमारीच्या घटनांनी खळबळ उडवली आहे. चाकूचा धाक दाखवत दुचाकी व मोबाईल चोरून नेण्याच्या या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दोन्ही घटनांमध्ये गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.

 

पहिली घटना : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लुट

20 सप्टेंबर रोजी रात्री 9.30 ते 10 वाजेच्या दरम्यान निलेश भगवानराव तांबोळी हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून घरी जात असताना दोन अनोळखी युवकांनी त्यांना अडवले. चाकूचा धाक दाखवून मारहाण केली आणि त्यांच्या ताब्यातील अंदाजे ₹30,000 किंमतीची दुचाकी (MH 26 BB 6146) जबरदस्तीने चोरून नेली. दुचाकीची किंमत ३० हजार रुपये आहे. या प्रकरणी संबंधित गुन्हा क्र. 401/2025 नुसार दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गुट्टे अधिक तपास करत आहेत.

 

दुसरी घटना : आंबेगाव फाट्यावर सकाळी लूट

त्याच दिवशी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास नांदेड-भोकर रस्त्यावरील आंबेगाव फाटा (तालुका अर्धापूर) येथे आणखी एक लुटीची घटना घडली. मनोज शामराव चव्हाण (रा. बारड) हे दुचाकीवरून जात असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांना अडवले. मारहाण करत त्यांची दुचाकी व मोबाईल मिळून एकूण ₹50,000 किमतीचा ऐवज बळजबरीने लंपास केला. या घटनेत गुन्हा क्र. 113/2025 नुसार दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक उत्तम बुकतरे तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!