नांदेड (प्रतिनिधी)-बोंडार बायपास रस्त्यावर गप्पा मारत बसलेल्या काही नागरिकांवर अज्ञात व्यक्तींनी धक्कादायक हल्ला चढवला. त्यांना धमकावून जवळील ₹34,500 रोख रक्कम जबरदस्तीने लुटल्याची घटना 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता घडली.
माधव संभाजी आरसुळे यांनी लिंबगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार,19 सप्टेंबर रोजी ते आणि त्यांचे मित्र बोंढार बायपास रस्त्यावर बसून गप्पा मारत होते.तेवढ्यात नंबर नसलेल्या तीन दुचाकींवर 5-6 जण आले आणि त्यांनी गटाला धाक दाखवून रोख रक्कम लुटून नेली. आरोपींनी माधव आरसुळे यांच्याकडून आणि त्यांच्या इतर साथीदारांकडून मिळून एकूण ₹34,500 जबरदस्तीने घेतले.या प्रकरणी गुन्हा क्र. 363/2025 नोंदवण्यात आला असून,पोलीस उपनिरीक्षक सय्यद या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू असून, परिसरातील CCTV फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास वेगाने सुरू असल्याचे समजते.घटनास्थळी रात्रीचं वेळी घडलेली ही लूट स्थानिकांमध्ये भीती निर्माण करणारी ठरली आहे.बायपास रस्ता सुनसान आणि अंधाराचाच असल्याने अशा प्रकारच्या गुन्ह्यांना सहज बळ मिळत असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू आहे.
