सरकारी नोकरीचे आमिष दाखवून 61 लाखांची फसवणूक ! महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी)-सरकारी नोकरी लावतो, असे आमिष दाखवत एका वयोवृद्ध नागरिकाची तब्बल ₹61 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही फसवणूक जून 2022 ते सप्टेंबर 2022 दरम्यान घडली असून, आता नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात एका महिलेसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंडित ज्ञानोबा पापुले (रा. वैसा, सिडको, नांदेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,त्यांच्या मुलाला शासकीय कार्यालयात नोकरी लावतो, असे सांगून नरसिंग हनुमंतराव मेघमाळे, अर्चना नरसिंग मेघमाळे (पती-पत्नी) आणि सतीश अशोकराव गुडलवार या तिघांनी त्यांच्याकडून रोख व ऑनलाइन स्वरूपात मिळून ₹61 लाख घेतले.

या तिघांनी बनावट बँक व पोस्ट खात्याचे नोकरीचे आदेशपत्र देखील तयार करून दिले. काही काळ त्या व्यक्तीला वाटत राहिले की मुलाची नोकरी लागली आहे, पण नंतर सगळे कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आले.या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 906/2025

भारतीय दंड संहितेचे कलम 420, 465, 467, 468, 471, 34 नुसार दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक पोलीस अधीक्षक नाईक यांच्याकडे प्रकरणाचा तपास देण्यात आला आहे.

फसवणुकीचा मास्टर प्लॅन

✅ बनावट सरकारी आदेश
✅ नोकरीचं खोटं आश्वासन
✅ विश्वासात घेऊन लाखोंची रक्कम हडप
✅ कुटुंबाच्या भविष्याशी खेळ

 नागरिकांना इशारा

वास्तव न्यूज लाईव्ह  नागरिकांना विनंती करत आहे की, कोणतीही सरकारी नोकरी “खाजगी मार्गाने” लावण्याचे आश्वासन देणाऱ्यांपासून सावध राहावे. सर्व भरती प्रक्रिया अधिकृत वेबसाइट किंवा जाहिरातीनुसारच केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!