नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील 26 पोलिस अंमलदारांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती बहाल करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या स्वाक्षरीने दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी अधिकृत आदेश जाहीर करण्यात आला.
या पदोन्नतीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून सेवेत असलेल्या पात्र पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. यामध्ये 29 वर्षांहून अधिक सेवा पूर्ण केलेले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर किमान 3 वर्षांची सेवा केलेले तसेच आश्वासित प्रगती योजनेनुसार पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील वेतनश्रेणी प्राप्त करणारे पोलीस अमलदार यांचा समावेश आहे.
पदोन्नती मिळवलेल्या 26 पोलीस अमलदारांची नावे पुढीलप्रमाणे –
दिलीप गोविंदराव जाधव (भोकर)
सतीश शंकरराव लकुळे (किनवट)
सुदर्शन रामलाल धांदू (देगलूर)
सुधाकर राजाराम कांबळे (शहर वाहतूक शाखा)
मच्छिंद्र आनंदा वाघमारे (कंधार)
सुभाष तुळशीराम तिडके (मोटार परिवहन विभाग)
दत्तात्रय मेश्राम शेळके (पोलीस मुख्यालय)
संभाजी इरबा देवकांबळे (भोकर)
बालाजी गोविंद अंबुलगेकर (नायगाव)
सुनील मारुतीराव सूर्यवंशी (उमरी)
संजय विश्वनाथ केंद्रे (स्थानिक गुन्हे शाखा)
सतीश लिंबाजी बनसोडे (पोलीस मुख्यालय)
शेख अहमद कालेजी (रामतीर्थ)
दिगंबर संभाजी जोंधळे (पोलीस मुख्यालय)
अब्दुल गणी अब्दुल कलाम इनामदार (महामार्ग सुरक्षा पथक बारड)
वसी अहेमद शब्बीर अहेमद सय्यद (शिवाजीनगर)
नईम खान मोहिनोद्दीन खान (नियंत्रण कक्ष)
माणिक मारुतीराव कदम (उमरी)
विश्वनाथ गिरजाजी पांचाळ (पोलीस मुख्यालय)
प्रकाश वीरभद्र तांबोळे (कुंटूर)
ताहेर गुलाम नबी शेख (मुक्रमाबाद)
जगन्नाथ व्यंकट जाधव (पोलीस मुख्यालय)
हबीब पाशुमियाँ शेख (रामतीर्थ)
नागोराव महिपतराव पोले (कुंटूर)
सुरेश शंकरराव गुरुपवार (पोलीस मुख्यालय)
कोमल बालाजी कांगणे (पोलीस मुख्यालय)
वास्तव न्यूज लाईव्ह सर्व पदोन्नतीप्राप्त श्रेणी पोलीस उपनिरीक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करते आणि त्यांच्या पुढील पोलीस सेवेसाठी शुभेच्छा देते.
