एसडीआरएफच्या सहाय्याने राहेगाव येथील १०५ नागरिकाची वैद्यकीय तपासणी

नांदेड,- पावसामुळे गोदावरी नदीच्या बॅकवॉटरचे पाणी राहेगाव, कीकी या दोन गावांना जोडणाऱ्या पुलावर आल्यामुळे राहेगावचा संपर्क मागील पाच दिवसांपासून तुटलेला होता.

गावातील नागरिकांनी गावातील आजारी लोकांना वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असल्याबाबत तहसीलदार संजय वारकड यांना सूचना केली. त्यांनी सदर बाब जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना अवगत करून त्यांचे मार्गदर्शन नुसार तात्काळ याबाबत एसडीआरएफ चे पोलीस निरीक्षक श्री राठोड व तालुका आरोग्य अधिकारी प्रवीण मुंडे यांच्याशी संपर्क साधून तात्काळ आवश्यक सूचना दिल्या.त्यानुसार एसडीआरएफ टीमच्या सहाय्याने वैद्यकीय पथक राहेगाव येथे जाऊन सदर गावातील 105 नागरिकांचे वैद्यकीय तपासणी करून औषधोपचार केले.

या कार्यवाहीत एसडीआरएफ चे जवळपास 20 जवान,स्टाफ नर्स रियाज शेख,श्रीमती एस जी करंकाळ,वैद्यकीय पथकाचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर शेख हसन,आरोग्य सेवक शैलेश वाघमारे, शेख मुमताज तसेच तुप्पा महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी प्रमोद बडवणे,ग्राम महसूल अधिकारी गौतम पांढरे, पोलीस पाटील प्रतिनिधी संजय इंगळे,किकीचे पोलीस पाटील गोविंद तेलंगे,आशाताई सुमित्रा इंगळे यांनी योगदान दिले.सदर मदत कार्यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!