बाळासाहेब देशमुखला पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-19 सप्टेंबरच्या मध्यरात्री 1 वाजेच्यासुमारास भाग्यनगर पोलीस पथकातील लोकांना अत्यंत घाणेरड्या शिव्या देवून सार्वजनिक शांतता भंग करून गोंधळ घालणार्‍या माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख कल्याणकरला पोलीसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने आज दुपारी त्यास एका दिवसासाठी पोलीस कोठडीच्या वास्तव्यास पाठविले आहे.
भाग्यनगर येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक बालाजी महाजन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19 सप्टेंबर रोजी रात्रगस्त ड्युटी करत असतांना त्यांना माहिती मिळाली केली. आ.बालाजी कल्याणकर यांच्या कार्यालयासमोर कोणी एक माणुस गोंधळ घालत आहे. तेंव्हा महाजन आणि त्यांचे हसकारी पोलीस तेथे पोहचले गोंधळ घालणारा व्यक्ती माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख (कल्याणकर) हा होता. पोलीसांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता पोलीस उपनिरिक्षक वाडेवाले, पोलीस अंमलदार पठाण आणि महाजन यांना शिव्या दिल्या. कोणत्याही परिस्थितीत तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. पोलीसांनी त्यांना पोलीस ठाणे भाग्यनगर येथे आणले. पोलीस अंमलदार वसमतकर हे त्यांना बोलत असतांना त्यांना बुक्का मारला इतरही अधिकारी आणि कर्मचार्‍यांना मारहाण केली. भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक संतोष तांबे आणि पोलीस निरिक्षक माळी हे सुध्दा समजावून सांगत असतांना त्यांच्याशी गोंधळ घातला. माझ्याजवळ पिस्टल आहे, माझ्यावर गुन्हा दाखल करून तर बघा तुम्हाला गोळ्या घालतो असे म्हणाला. बाळासाहेब देशमुखने दिलेल्या शिव्या अशा शब्दात आहेत की, त्या लिहुन आम्ही आमची लेखणीचा मान कमी करून घेवून इच्छीत नाही. भाग्यनगर पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 123,296, 121(1), 352, 351(2) आणि महाराष्ट्र दारु बंदी कायदा कलम 85 (1) नुसार गुन्हा दाखल केला आणि बाळासाहेब देशमुख (कल्याणकर) ला अटक केली. या गुन्ह्याचे तपासीक अंमलदार पोलीस उपनिरिक्षक देशमुख यंानी बाळासाहेब देशमुखला आज दुपारी न्यायालयात हजर करून तपासाच्या प्रगतीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने बाळासाहेब देशमुखला एका दिवसासाठी पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!