नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यात अनेक पोलीस ठाण्यांवर पोलीस निरिक्षक हे पद मंजुरी असतांना त्या ठिकाणचा कारभार मात्र सहाय्यक पोलीस निरिक्षक चालवत आहेत. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी दोन-दोन पोलीस निरिक्षक एका ठाण्यात आहेत आणि बरेच पोलीस निरिक्षक नियंत्रण कक्षात नियुक्तीची वाट पाहत आहेत.
नांदेड जिल्ह्यात एकूण 36 पोलीस ठाणे आहेत. त्यात तालुक्याच्या ठिकाणी पोलीस निरिक्षकांचे पद आहे. लिंबगाव येथे सुध्दा पोलीस निरिक्षकांचे पद मंजुर आहे. तसेच मरखेल या पोलीस ठाण्यात सुध्दा पोलीस निरिक्षकांचे पद मंजुर आहे. कारण तो भाग कधीकाळी नक्षलग्रस्त मानला जात होता.
हदगाव, उमरी हे तालुके आहेत. पण या ठिकाणी पोलीस निरिक्षकांऐवजी सहाय्यक पोलीस निरिक्षक कार्यरत आहेत. या मागचे काय गम असेल. याचा शोध अवघड दिसतोय. मरखेल पोलीस ठाणे येथे सुध्दा पोलीस निरिक्षकांचे पद मंजुर असतांना तेथे सुध्दा सहाय्यक पोलीस निरिक्षक कार्यरत आहेत. नांदेड जवळ लिंबगाव पोलीस ठाण्यात सुध्दा पोलीस निरिक्षकांचे पद मंजुर असतांना तेथील कारभार सुध्दा सहाय्यक पोलीस निरिक्षकांच्या हातात देण्यात आला आहे.
मंजुर पद मोठ्या पदाचे असतांना लहान पदाचे अधिकारी तेथे कारभार चालवित आहेत. काय या मागील आयडीया असेल ज्यातून छोटा अधिकारी सुध्दा कामकाज चालवू शकतो असा कयास लावण्यात आला आहे आणि असेच असेल तर नांदेड जिल्ह्यात असे अनेक पोलीस उपनिरिक्षक आणि पोलीस अंमलदार आहेत त्यांना जर पोलीस ठाण्याचा प्रभार दिला तर ते नक्कीच मोठ्या पदाच्या अधिकाऱ्यापेक्षा अत्यंत उत्कृष्ट आणि दमदार काम करुन शासनाच्या तिजोरीत मोठा महसुल जमा करतील.
नांदेड जिल्ह्यात सीआरओमध्ये 7 पोलीस निरिक्षक असतांना सुध्दा सहाय्यक पोलीस निरिक्षक सांभाळतात पोलीस 4 ठाण्याचा कारभार
