नांदेड(प्रतिनिधी)-मौजे रिसनगाव ता.लोहा येथे मराठा आणि इतर मागासवर्गीय यांच्यामध्ये सुरु असलेला वाद जास्त वाढू नये यासाठी बोलविण्यात आलेल्याा समन्वय समितीची बैठक सुरु असताना बाहेर वाद झाला आणि दोन्ही समाजातील एक-एका व्यक्तीचे डोके फुटले आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार मौजे रिसनगाव येथे दोन समाजामध्ये होत असलेला वाद हा जास्त वाढू नये आणि त्यांचा परिणाम सार्वजनिक शांतता भंगात होवू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने एक बैठक बोलाविण्यात आली होती. ती बैठक एका हॉलमध्ये सुरु असताना मराठा समाजातील सरपंच प्रतिनिधी विकास शेषराव पवार आणि ओबीसीमध्ये समाजाचे व्यक्ती दत्ता एकलारे या दोघांमध्ये हॉलबाहेर वाद झाला आणि दोघांनी लाठ्याकाठ्याचा वापर करुन एकमेकांवर हल्ला केला. यात इतर तीन जण जखमी झाले आहेत. विकास पवार आणि दत्ता एकलारे यांचे डोके फुटले असल्याचे सांगण्यात आले. त्यांना उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आले आहे.
या घटनेचा संदर्भ देवून पत्रकार परिषदेत खासदार अशोक चव्हाण यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, ज्या कोणाला काय काय मागायचे आहे ते मागता येईल. पण दोन समाजामध्ये वाद घडवून किंबहुना एक दुसऱ्याचे डोके फोडून अशी मागणी अयोग्य असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
मौजे रिसनगाव ता.लोहा येथे मराठा-ओबीसी वाद पेटला
