नांदेड(प्रतिनिधी)-शेतीच्या वादातून 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता आणि नंतर दुपारी 2 वाजता भावकीच्या लोकांमध्ये झालेल्या भांडणानंतर उस्माननगर पोलीसांनी दोघांविरुध्द जिवघेणा हल्ला सदरात दोन गुन्हे दाखल केले आहेत.
गुरुनाथ गंगाधर हुंबाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.16 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजेच्यासुमारास मौजे नंदनवन ता.कंधार येथील मारोती उध्दव पांचाळ यांच्या शेत शिवारात योगेश उत्तम हुंबाड आणि तानाजी गोविंद हुंबाड या दोघांनी मिळून वाद सुरू असलेल्या शेतामध्ये पंच म्हणून हजर राहण्यास गेला असतांना गुरूनाथ हुंबाडला तु बोलणारा कोण असे म्हणत दोघांनी दगडाने मारहाण केली. एकाने चाकूच्या सहाय्याने कायमचे संपवतो असे म्हणून पोटावर केला. गुरुनाथने तो वार दोन्ही हाताने आडवल्याने त्यांच्या हाताला दु:खापत झालेली आहे. एमएलसी जबाबानुसार 17 सप्टेंबर रोजी गुन्हा क्रमांक 239/2025 दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक सुर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.
या तक्रारीच्याविरोधात तानाजी गोविंदराव हुंबाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुरूनाथ गंगाधर हुंबाड आणि त्यांचा मुलगा शुभम गुरूनाथ हुंबाड या दोघांनी दि.16 स प्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास तानाजी हुंबाड यांच्या शेतात मौजे नंदनवन येथे तानाजी हुंबाडच्या चुलत भावाबद्दलच्या शेतीच्या वादाच्या कारणावरुन गुरुनाथ हुंबाडने जिवे मारण्याच्या हद्देशाने चाकूहल्ला केला. एमएलसी जबाबावरुन 17 सप्टेंबर रोजी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 240/2025 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक गाडेकर हे करीत आहेत.
मौजे नंदनवन येथे परस्पर विरोधी जिवघेणा हल्याचे गुन्हे दाखल
