नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीनगर कौठा येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 42 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरले आहेत. तसेच वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे वसाहतीत एक घरफोडून चोरट्यांनी 4 लाख 55 हजार 300 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरुन नेले आहेत.
आरोग्य सहाय्यक सुरेश काशिनाथ खोकले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.13 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता ते आणि त्यांच्या पत्नी हिंगोली येथे गेले होते. त्यांचा मुलगा हिंगोलीमध्ये राहतो. 14 सप्टेंबरच्या सकाळी 8 वाजता परत आले तेंव्हा त्यांचे घरफोडलेले होते. शयन कक्षातील लाकडी कपाटात ठेवलेले 1 लाख 42 हजार रुपये किंमतीचे दागिणे चोरट्यांनी गायब केले होते. नांदेड ग्रामीण पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 890/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक सुनिल भिसे अधिक तपास करीत आहेत.
वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे स्थानकाच्या शेजारी रेल्वे कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. तेथील चंद्रकांत अशोक झुंजारे हे 13 नोव्हेंबरच्या रात्री 10 वाजता बाहेर गावी गेले होते. 14 सप्टेंबरच्या सकाळी 8 वाजता परत आले तेंव्हा त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे जुने दागिणे 4 लाख 55 हजार 300 रुपये किंमतीचे चोरून नेले आहेत. वजिराबाद पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 391/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक गुट्टे अधिक तपास करीत आहेत.
लक्ष्मीनगर कौठा येथे 1 लाख 42 हजारांची चोरी; रेल्वे वसाहतीत 4 लाख 55 हजारांची चोरी
