नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील पद्मजा सिटीमध्ये झालेली चोरी उघडकीस आल्यानंतर त्याची माहिती देत असतांना पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी जास्तीत जास्त प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे असून आपल्या आस्थापनेतील सुरक्ष रक्षकांची जबाबदारी वाढविण्याची गरज सांगितली.
पद्मजा सिटीमध्ये दोन महिन्यापुर्वी झालेल्या चोरीचा गुन्हा उघडकीस आला. त्यामध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल सुध्दा जप्त करण्यात आला. या संदर्भाची माहिती पत्रकारांना देतांना पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार सांगत होते की, पद्मजा सिटीमध्ये 5 फुटाची संरक्षण भिंत आहे. तसेच त्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज बंद आहेत. सोबतच चोरी कोणत्या दिवशी झाली हे शोधतांना पोलीस विभागाने 90 तासांचे इतर सीसीटीव्ही तपासले आहेत. पण कोणताही मागमुस नसतांना या चोरीचा शोध लावण्यात यश आले. या प्रसंगी अबिनाशकुमार यांनी जनतेला आवाहन केले आहे की, सध्या सीसीटीव्ही फुटेजचा खर्च पुर्वीच्या तुलनेत आता खुप कमी झालेला आहे. त्याहीशिवाय आसपासच्या लोकांनी आपसात ठरवून सीसीटीव्ही लावले तर अजून खर्चाची बचत होईल. सोबतच आस्थापना, रहिवासी सोसायट्या यांच्या सुरक्षा भिंतीची उंची वाढविणे आवश्यक आहे. फक्त मुख्यद्वारावर सुरक्षा रक्षक ठेवून जमणार नाही. तर सुरक्षा रक्षकाने आपल्या सोसायटीत गस्त करायला हवी. यासंदर्भाने मी जनरतेला आवाहन करतो आहे की, त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात माझ्या शब्दांकडे लक्ष द्यावे. छोट्या-छोट्या गल्लींमध्ये अनेक दुकाने असतात त्या दुकानदारांनी आणि काही रहिवासी घरांनी सुध्दा एकत्रीतपणे सीसीटीव्ही कॅमेरे लावले तर त्यांचा खर्च कमी होईल आणि सुरक्षेचा प्रभाव वाढेल. पोलीसांना काम करत असतांना काही तरी हिंट मिळणे आवश्यक आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे ती हिंट मिळू शकते जेणे करून गुन्हा उघडकीस आणण्यास मदत होईल. शहरातील सार्वजनिक सीसीटीव्ही कॅमेरे संदर्भाने पोलीस विभाग आणि महानगरपालिकेने एक सविस्तर आराखडा तयार करून पाठविला आहे. तो शासनाच्या तंत्रज्ञान विभागाकडे सध्या प्रलंबित आहे. त्याचाही पाठपुरावा करून शहरातील सार्वजनिक सीसीटीव्ही लवकरात लवकर लावले जातील. यासाठी आम्ही प्रयत्न करू असे अबिनाशकुमार म्हणाले.
जनतनेने जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग करावा-अबिनाशकुमार
