नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार बालाजी सातपुते आणि त्यांचे बंधू केशव सातपुते या दोघांवर दोन तासापुर्वी विष्णुपूरी गावात जिवघेणा हल्ला झाला आहे. हल्लेखोर 4-5 संख्येत होते असे सांगण्यात येत आहे. दोन्ही सातपुते बंधू सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज दुपारी 3 वाजेच्यासुमारास विष्णुपूरी गावात राहणारे आणि वजिराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीसा अंमलदार बालाजी सातपुते आणि त्यांचे बंधू केशव सातपुते यांच्यावर जिवघेणा हल्ला झाला आहे. हल्लेखोर चार ते पाच संख्येत होते असे सांगण्यात येत आहे. हल्लेखोरांनी तलवारीच्या सहाय्याने सातपुते बंधूंना जखमी केले आहे. घटना घडल्यानंतर अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या दोन्ही सातपुते बंधूंवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वजिराबादमधील पोलीस अंमलदार बालाजी सातपुते आणि त्यांच्या बंधूवर जिवघेणा हल्ला
