नांदेड(प्रतिनिधी)-काल रात्री 11 वाजेच्यासुमारास बारसगाव पाटीजवळ महामार्ग क्रमांक 61 वर दुचाकीवर जाणाऱ्या दोन युवकांचा अपघात झाला आहे. दुचाकी चालविणाऱ्याचे नियंत्रण सुटल्याने त्यांची गाडी ट्रकवर पाठीमागून आदळली आणि दोघांचा मृत्यू झाला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री अर्थात 13 सप्टेंबरच्या रात्री 11 वाजता विनानंबरची एक दुचाकी गाडी महामार्ग क्रमांक 61 वर मौजे बारसगाव पाटीजवळ जात असतांना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती दुचाकी सिमेंट भरलेला ट्रक क्रमांक जी.जे.02 एक्स एक्स 6499 ला पाठीमागच्या बाजूने धडकली. दुचाकी भोकर ते भोकरफाटाकडे जात होती आणि ट्रक उभा होता. या अपघातात राहुल सुरेश भंडारे (21) रा.पिंपळखेडा ता.हदगाव आणि अभिषेक नारायण गाडे (21) रा.पोटा ता.हिमायतनगर जि.नांदेड या दोन युवकांचा मृत्यू झाला आहे.
बारड महामार्ग सुरक्षा पथकातील सहाय्यक पोलीस निरिक्षक ढवळे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गणी, पोलीस अंमलदार बालाजी हिंगनकर आणि केंद्रे यांनी अपघात घडल्यानंतर काही मिनिटात ते तेथे पोहचले परंतू दुर्देवाने पुर्वीच ते मरण पावले होते. विस्कळीत झालेली वाहतुक पोलीसांनी सुरळीत केली आहे आणि पुढील कार्यवाही अर्धापूर पोलीसांकडे देण्यात आली आहे.
बारसगावजवळ रात्री घडलेल्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू
