संयुक्त राष्ट्र संघामध्ये भारत देशाने प्लॅलेस्टाईन देशाच्या स्वातंत्र्यासाठी मतदान केले. भारत सरकार किंवा भारत सरकारमधील कार्यकर्त्यांनी खा.प्रियंका गांधी यांनी आपल्या काखेत प्लॅलेस्टाईन लिहिलेली बॅग घेवून संसेदत आल्या होत्या तेंव्हा त्यांच्यावर खुप ट्रोलिंग केली. इजरायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहु आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत जवळचे मित्र असतांना प्लॅलेस्टाईनच्या पक्षात भारत देशाने का मतदान केले. याचा अर्थ असा म्हणायचा नाही काय की, खा.प्रियंका गांधीचेच भारत सरकारने ऐकले. तसेच 2024 च्या निवडणुकांनंतर शपथ घेतांना खा.असदोद्दीन ओवेसी यांनी जय फिलीस्तीन अशी घोषणा दिली होती. म्हणजे त्यांचेही ऐकलेच ना. खा.प्रियंका गांधी यांच्याविरुध्द ट्रोल करतांना यासर आराफात यांना माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांनी भारताचा सर्वोच्च सन्मान दिल्याचा फोटो आणि व्हिडीओ वापरून सांगण्यात आले होते की, यासर आराफात यांनी हजारो लोकांची हत्या केली होती आणि त्यांना सन्मान दिला गेला. या ईतिहासाच्या आठवणीवरुन बोलणाऱ्यांना खरे तर इजरायल आणि प्लॅलेस्टाईन यांचा अभ्यासच नाही. त्यांचा संपुर्ण ईतिहास माहित नाही आणि आम्हीच हुशार आहोत म्हणण्यातच सर्व परेशान आहेत. वाचकांना आठवत असेल तर भाजप खा.अनुराग ठाकुर यांनी संसेदमध्ये खा.राहुल गांधी यांना उद्देशुन असे बोललेले होते की, ज्याला स्वत:ची जात माहित नाही तो जातीय जणगणने बद्दल बोलतो. यावर खा.अखिलेश यादव हे अत्यंत रागावले होते आणि संसदेत त्यांनी जात हा विषय आलाच कसा असा बुलंद आवाज केला होता. पण खा.राहुल गांधी यांनी सांगितले की, तुम्ही माझी बेअबु्र केली आहे, माझे हितचिंतक त्यामुळे परेशान आहेत ते तुम्ही माफी मागा असे म्हणत आहेत. परंतू मला तुमच्या माफीची गरज नाही आणि मी तुम्हाला माफी मागा असे म्हणणार नाही. यावरुन कोण उत्कृष्ट व्यक्ती आहे हे वाचकांनी ठरवावे.
संयुक्त राष्ट्रसंघामध्ये प्लॅलेस्टाईन संदर्भाने एक प्रस्ताव आला. त्यात त्यांना स्वतंत्र देश अशी मान्यता देण्याचा विषय होता. एकूण 193 सदस्य देशांपैकी 142 देशांनी प्लॅलेस्टाईनच्या हक्कात मतदान केले आहे. फक्त 10 देश त्यांच्या विरोधात गेले आणि 12 देश अलिप्त राहिले. या प्रस्तावाला समर्थन देणाऱ्या देशामध्ये भारतसह चिन, रशिया, सौदीअरब, कत्तक, युके्रन, ईटली, फ्रान्स, यु.के. असे मात्तबर देश आहेत. इजरायल आणि अमेरिका या दोन देशांसह इतर आठ देशांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. नेतंन्याहू मात्र असे स्फोटक वक्तव्य करत आहे की, जग तिसऱ्या महायुध्दाकडे जाईल असे दिसते. पत्रकार म्हणून जनतेला बातमी देणे, दाखवणे आणि त्यातील सत्यता मांडणे ही आमची जबाबदारी आहे.

संयुक्त राष्ट्र संघात असा प्रस्ताव आला होता की, तो वाचकांनी समजून घेणे आवश्यक आहे. शुक्रवारी 11 सप्टेंबर 2025 रोजी हा प्रस्ताव आला होता. संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो बुटरेज म्हणाले मध्यपुर्व आशियाखंडात शांतीसाठी या दोन राष्ट्रांमध्ये समाधान अंमलात येणे महत्वपुर्ण आहे. जेथे दोन स्वतंत्र आणि संप्रभु तसेच लोकशाही प्रणालीला महत्व देत त्यांनी सोबत राहावे. दोघांमध्ये शांती आणि सुरक्षा हा महत्वाचा विषय आहे. 7 पानांच्या या प्रस्तावात गजामध्ये युध्द समाप्त करण्यासाठी सामुहिक एकजुट गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे न्यायपुर्वक आणि शांतीपुर्ण समाधान निघेल. भविष्यातील नेतृत्वात हामासला बाहेर करण्याची मागणी आहे. तसेच हामासचा सर्व प्लॅलेस्टाईन गटांनी आव्हाण करण्यात आले आहे की, त्यांनी आपली हत्यारे समर्पित करावी. जेणे करून त्यांच्यासाठी सुध्दा स्वतंत्र देश बनविण्याच्या मार्गावर दृढ काम होईल. तशी ही बातमी आनंदाची आहे आणि भारत देशाने त्या पक्षात मतदान केले आहे.

हामासवर आरोप होतो की, त्यांनी 7 ऑक्टोबर 2023 रोजी 1200 इजराईलींना मृत्यू दिला आणि आजही अनेक इजराईल त्यांच्या ताब्यात आहेत. परंतू त्यानंतर नेतंन्याहू यांनी हामासच्या 65 हजार नागरीकांची हत्या केली आहे आणि म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघ हामासला या प्रक्रियेतून बाहेर करण्याचा प्रयत्न करत आहे. खा.राहुल गांधी, खा.प्रियंका गांधी, खा.असदोद्दीन ओवेसी हे नेहमीच प्लॅलेस्टाईनच्या समर्थनात बोलत होते आणि ते आजही बोलतात. म्हणून आज भारत देशाने संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मतदानात प्लॅलेस्टाईनच्या हक्कात मतदान केले म्हणजे खा.प्रियंका गांधी, खा.असदोद्दीन ओवेसी यांचेच ऐकल्याचे आम्ही लिहिले तर त्यात काय वावगे.

