नांदेड (प्रतिनिधी) : येथील आंबेडकरवादी मिशनच्या वतीने आयोजित शिक्षण क्रांती परिषदेत चर्मकार समाजाने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेने केले आहे.
रविवार दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आंबेडकरवादी मिशन, डाॅ. आंबेडकर चौक (लातूरफाटा), सिडको नवीन नांदेड येथे आयोजित या ऐतिहासिक बौद्ध मातंग चर्मकार सकल अनुसूचित जाती शिक्षण क्रांती परिषदेत अनु. जातीतील सर्व ५९ जातींनी सहभागी होऊन समाजाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घ्यावा असे आवाहन संयोजक दिपक कदम यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची या परिषदेस प्रमुख उपस्थिती राहणार असून पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांचे हस्ते उदघाटन होणार आहे. सर्व उपेक्षित समाजात शिक्षण क्रांती होण्याच्या दिशेने या परिषदेत रणनिती ठरविण्यात येणार आहे तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
चर्मकार समाजातील शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी, अधिकारी, व्यापारी, युवक युवती महिला आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या शिक्षण क्रांती परिषदेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे अध्यक्ष इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले आहे.
