लोहा तालुक्यात मराठा-ओबीसी वाद पेटला
नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने हैद्राबाद गॅजेट लागून करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा शासकीय आदेश पारी केला. यामुळे ओबीसी आणि मराठा हा वाद चव्हाट्यावर आला. यातच हैद्राबाद गॅजेटचा शासकीय आदेश रद्द करण्यात यावा यासाठी प्रा.मनोहर धोंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. हा राग मनात धरुन मराठा समाजाने त्यांच्या जातीतील 21 विद्यार्थ्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र (टी.सी) आम्हाला देण्यात यावे अशा स्वरुपाचे अर्ज शाळेच्या मुख्याध्यापकाकडे केल्याने लोहा तालुक्यात ओबीसी आणि मराठा हा वाद पेटणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात याव यासाठी मराठा समाजाच्यावतीने मुंबई येथील आझाद मैदानावर मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरू केल होत. याच आंदोलनादरम्यान राज्य शासनाने यांच्या मागण्या मान्य करत यातील मुख्य मागणी हैद्राबाद गॅजेट लागू केल आणि या गॅजेटच्या आधारे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार असल्याने ओबीसी समाज कमालीचा नाराज झाला. यातच ओबीसीचे नेते तथा आखिल भारतीय शिवा विरशैव संघटनेचे अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात शासनाने काढलेला हा जीआर रद्द करण्यात यावा. अशी याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी झाली नसली तरी मराठा समाजाने जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एकीकडे फुले-शाहु-आंबेडकर या विचारांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. पण आता मराठा समाजाकडून जातीयतेच बीज रुजविण्याचे काम लोहा तालुक्यातील रिसनगाव येथील याचिकाकर्ते प्रा.मनोहर धोंडे यांची मा.मिनाताई ठाकरे प्राथमिक शाळा असून या शाळेत अनेक जाती धर्माचे विद्यार्थी आहेत. पण मराठा आरक्षणाच्या विरोधात मनोहर धोंडे यांनी याचिका दाखल केली म्हणून त्यांच्या शैक्षणिक संस्थेत मराठा समाजाचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी एकत्र येवून आमच्या पाल्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र देण्यात यावे अशा स्वरुपाचे अर्ज मुख्याध्यापकाला दिले. यामुळे मराठा आणि ओबीसी हा वाद निर्माण झाल्याचे चित्र लोहा तालुक्यातील रिसनगाव येथे पाहण्यास मिळाले. एकंदरीत हा वाद सामाजिक दृष्टीकोणातून कोणाला परवडणारा नाही. यामुळे राज्यातील जातीय सखलोका आबादीत ठेवण्यासाठी व पुरोगामी महाराष्ट्राची ओळख मिटवायची नसेल तर असे वाद निर्माण करणे हे चुकीचे असल्याचे अनेक जानकारांनी सांगितले आहे.
