नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी गोदावरी नदीपात्रातील विष्णुपूरी प्रकल्पात छापा टाकून रेती उपसा करणारी ईलेक्ट्रीक मोटार व इतर साहित्य किंमत 4 लाख 5 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल पकडला आहे.
पोलीस अंमलदार विठ्ठल माधव भिसे यांच्या तक्रारीप्रमाणे पोलीस उपअधिक्षक प्रशांत शिंदे, पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस उपनिरिक्षक बाबुराव चव्हाण, व्यंकट कुसमे, पोलीस अंमलदार केंद्रे, मुंडे, गंगलवाड, माळगे, शेख आणि भिसे हे 12 सप्टेंबरच्या दुपारी मिळालेल्या माहितीनुसार विष्णुपूरी प्रकल्पाजवळ गेले. तेथे 10 ब्रास वाळू 50 हजार रुपयांची, रेती उपसा करणारी इलेक्ट्रीक मोटार 50 हजार रुपयांची सहा तराफे 3 लाख रुपयांचे, इलेक्ट्रीक वायर 30 फुट 3 हजार रुपयांचे, 10 फुट पाईप 1200 रुपयांचे, दोन फावडे 400 रुपयांचे, दोन प्लॉस्टीक टोपले 500 रुपयांचे असा एकूण 4 लाख 5 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल तेथे सापडला. या प्रकरणी अज्ञात तिन आरोपींविरुध्द वेगवेगळ्या चार कायद्यानुसार गुन्हा क्रमांक 885/2025 दाखल करण्यात आला.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळू उपसा करणारे 4 लाखांचे साहित्य पकडले
