पावसाने पुन्हा एकदा जोर धरला

नांदेड(प्रतिनिधी)-कालपासून पावसाची सुरूवात झाली. आज दिवसभरात जिल्ह्यात अनेक ठिकाणी काही-काही वेळेच्या फरकाने पावसाने हजेरी लावली. कै.डॉ.शंकरराव चव्हाण जलप्रकल्प विष्णुपूरी येथील एक दरवाजा उघडण्यात आला आहे. त्यातून 14 हजार क्युमेक्स पाणी विसर्ग होत आहे.
काल संध्याकाळपासून पावसाचा जोर दिसू लागला. तरी पण रात्री जास्त पाऊस आला नाही. पण सकाळ झाल्यावर पावसाने काही-काही काळाच्या अंतराने नांदेड शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार हजेरी लावली. त्यामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले. पावसाने यंदा शेतकर्‍यांना धुवून काढण्याचाच निर्णय घेतला आहे की काय. आता वृत्तलिहिपर्यंत सुध्दा पाऊस सुरू आहे. सखल भागात पुन्हा पाणी साचले आहे. त्यामुळे प्रवास सुध्दा अवघड झाला आहे. आज शुक्रवारचा आठवडी बाजार पण भरला आहे. परंतू त्यात ग्राहकांची कमतरता आहे. अति पाऊस आल्यामुळे कापसाचे बोंढ काळे पडले आहेत अशी माहिती पत्रकार संगमेश्र्वर बाचे यांनी प्रसारीत केली आहे.
प्रशासनाने पुन्हा एकदा दि.16 सप्टेंबरपर्यंत जिल्हयात येलो अलर्ट जारी केला आहे. त्यात 13 सप्टेंबर हा दिवस ऑरेंज अलर्टमध्ये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!