लोहामधील जैन मंदिर फोडून चोरी

लोहा(प्रतिनिधी)-लोहा येथील देऊळगल्ली भागात असलेल्या ऋषभनाथ दिगंबर जैन मंदिराची दान पेटी फोडून चोरट्यांनी रोख रक्कम आणि मुर्तीचे छत्र असा एकूण 1 लाख 43 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.
अमोल हिरालाल घंटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 सप्टेंबरच्या रात्री 9 वाजेपासून ते 11 सप्टेेंबरच्या पहाटे 7 वाजेदरम्यान देऊळगल्ली लोहा येथे असलेल्या ऋषभनाथ दिगंबर जैन मंदिराच्या गाभाऱ्याचा कुलूप कोंडा तोडून दान पेटीतील 35 हजार रुपये रोख रक्कम, पितळ, चांदीचे मुर्ती छत्र असा एकूण 1 लाख 43 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. लोहा पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 288/2025 नुसार नोंदवली असून पोलीस उपनिरिक्षक पांचाळ अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!