नांदेड(प्रतिनिधी)-एका 50 वर्षीय व्यापाऱ्याची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. एक अनोळखी महिला आणि एका अनोळखी पुरूषाने 10 लाख 38 हजार 570 रुपये ऑनलाईन भरायला लावले आहेत.
मंत्रीनगर, भावसार चौक नांदेड येथील व्यापारी राजेश्र्वर जगन्नाथ बचेवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 जुलै 2025 ते 23 जुलै 2025 दरम्यान टेलीग्राम आयडी क्रमांक @M301978 आणि व्हाटसऍप क्रमांक 9724271282 आणि एका अनोळखी माणसाचा मोबाईल क्रमांक 8734826938 या दोघांनी संगणमत करून लिंक व मेसेज पाठवून पार्टटाईम जॉब आणि ऑनलाईनद्वारे टासक पुर्ण केल्यास कमिशन देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 10 लाख 38 हजार 570 रुपये भरून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तक्रार केली. भाग्यनगर पोलीसंानी हा प्रकार गुन्हा क्रमांक 497/2025 नुसार दाखल केला असून पोलीस निरिक्षक संतोष तांबे अधिक तपास करीत आहेत.
50 वर्षीय व्यापाऱ्याची ऑनलाईन पध्दतीत 10 लाख 38 हजार 570 ची फसवणूक
