नांदेड(प्रतिनिधी)-शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयीन ओळखपत्र दर्शनिय भागात लावणे बंधनकारक करण्याचे शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केले आहे. या अगोदर सुध्दा अनेक वेळेस असे आदेश जारी झाले होते. पण त्याची पुर्ण अंमलबजावणी होतच नाही.
10 सप्टेंबर 2025 रोजी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव शाहजहान मुलाणी यांच्या डिजिटल स्वाक्षरीने जारी झालेल्या परिपत्रकात असे नमुद आहे की, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात असतांना आपले ओळखपत्र दर्शनिय भागात लावत नाहीत. पण आता या परिपत्रकानुसार शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयात प्रवेश करतांना आणि कार्यालयात हजर असतांना आपले ओळखपत्र आपल्या शरिरावर दर्शनीय भागात लावणे बंधनकारक आहे. असे न करणार्या अधिकारी आणि कर्मचार्यांविरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही होणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधीत घटकप्रमुखाला देण्यात आली आहे. शासनाने आपले हे परिपत्रक संकेतांक 202509101805522707 प्रमाणे शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहे.
राज्य शासनाच्या अधिकारी आणि कर्मचार्यांनी आपले ओळखपत्र दर्शनिय भागात लावणे आवशयक
