नांदेड(प्रतिनिधी)-मौजे दापका राजा ता.मुखेड येथील एका व्यक्तीने 3 टक्के दराने अवैधरित्या व्याजाने पैसे दिल्याप्रकरणी सहाय्यक अधिकारी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था येथील सहाय्यक अधिकारी नारायण श्रीरंगराव होनराव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 31 जानेवारी 2025 ते 24 जून 2025 दरम्यान दापका राजा ता.मुखेड येथील मारोती किशन गायकवाड याने पिडीत व्यक्तीला अवैधरित्या 3 टक्के दराने 13 हजार 500 रुपये कर्ज दिले. यातील पिडीत व्यकतीचा भाऊ जनक रामराव गायकवाड यांच्याकडे दरमहा व्याज दराने बेकायदेशीर आणि अवैध सावकारी व्यवहार केले आहेत. मुखेड पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 213/2025 दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार तेलंग हे करीत आहेत.
बेकायदा सावकारी करणार्याविरुध्द गुन्हा दाखल
