शासनाचे विविध फायदे मिळवून देतो म्हणून 48 लाखांची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-एका शिक्षकाला खोटे बोलून शासनाचे अनेक लाभ मिळवून देतो असे सांगून ऑनलाईन आणि रोख रक्कम अशा माध्यमातून 47 लाख 90 हजार 876 रुपयांची ठकबाजी करणार्‍या एका व्यक्ती विरुध्द देगलूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील फिर्यादी आणि आरोपी हे दोघे मुळ राहणारे जि.बिदर राज्य कर्नाटक असे आहेत.
संजय नरहरी खरात रा.बावलगाव ता.कमालनगर जि.बिदर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सन 2021 ते 2024 या दरम्यान पंढरी शिवाजी नाईक (31) रा.बावलगाव ता कमालनगर जि.बिदर याने पेट्रोलपंप, बइरबार, म्हाडाची घरे, विमा पॉलीस आणि शासनाचे अनेक फायदे मिळवून देतो म्हणून संजय खरात यांच्याकडून ऑनलाईन माध्यमातून 25 लाख 89 हजार 163 रुपये आणि रोख स्वरुपात 22 लाख 1 हजार 713 रुपये असे एकूण 47 लाख 90 हजार 876 रुपये घेवून त्यांची ठकबाजी केली आहे. देगलूर पोलीसांनी या संदर्भाने गुन्हा क्रमांक 450/2025 दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक नरहरी फड हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!