नांदेड(प्रतिनिधी)-दोन चोरट्यांना पकडून सोनखेड पोलीसांनी सोनखेड हद्दीतल चार चोरीचे गुन्हे आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक असे 5 चोरीचे गुन्हे उघडकीस आणून 1 लाख 37 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस ठाणे सोनखेडच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असतांना पोलीस उपअधिक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक वैशाली कांबळे, पेालीस अंमलदार गणपत गिते, वामन नागरगोजे, विश्र्वनाथ हंबर्डे, केशव मुंडकर आणि रमेश वाघमारे यांनी मेहनत घेवून लोहा येथील सदाम कोंडाजी घोडगे (34) तसेच युनूस नजिर कुरेशी (33) यांना ताब्यात घेतले. या दोघांकडून पोलीसांनी 67 हजार 500 रुपये रोख रक्कम आणि 70 हजार रुपये किंमतीची एक दुचाकी गाडी असा 1 लाख 37 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या चोरट्यांनी सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक असे 5 चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
सोनखेड पोलीसांनी दोन चोरट्यांना पकडून पाच चोरीचे गुन्हे उघड केले
