नेपाळमध्ये घडलेल्या घटनानंतर तसेच भारतात होवू शकते काय? यावर भारतात होणारी चर्चा भांडणात बदलत आहे

भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये दोन दिवसापासून जनआक्रोश सुरू आहे. पंतप्रधानांसह सर्व मंत्री मंडळाने राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनामा घेणाऱ्या राष्ट्रपतींनी सुध्दा राजीनामा दिला आहे. काही वर्षापुर्वी श्रीलंकेत सुध्दा असेच घडले होते आणि मागील वर्षी सन 2024 मध्ये सुध्दा असेच घडले आहे. यामुळे भारतात असे काही घडेल काय? यावर चर्चा सुरू आहे. काही विश्लेषक घडू शकते असे म्हणतात. काही विश्लेषक असे सांगतात की, ज्या पध्दतीचा जनआक्रोश श्रीलंका, बांग्लादेश आणि नेपाळमध्ये घडला. त्यासाठी पोटात भुकेची तिडक उठलेली होती. भारतात मात्र शासनाने जवळपास 90 कोटी लोकांना लाभार्थी बनवून ठेवलेले आहे. त्यामुळे असे काही घडणार नाही असे काहींचे मत आहे. तर काही म्हणतात मागील अकरा वर्षापासून आम्ही घोषित न केलेली आणीबाणीच पाहत आहोत. मग हे घडण्याची शक्यता सुध्दा आहे. आम्ही वाचकांसमोर सत्य मांडत आहोत. वाचकांनी स्वत: याचे उत्तर द्यावे की काय घडू शकते.
दोन दिवसांपुर्वीच राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्याकडे मंजुरीसाठी आलेले विधेयक किती दिवस ठेवता येते यावर सर्वोच्च न्यायालयाने एक विहित कालखंड सुनिश्चित केला आहे. या निर्णयाच्या पुर्नविलोक याचिकेची सुनावणी मुख्य न्यायमुर्ती भूषण गवई यांच्यासमोर सुरू असतांना त्यांनी भारताचे महाअभिवक्ता तुषार मेहता यांना सांगितले की, नेपाळमध्ये काय सुरू आहे पाहा! या चार शब्दांनी एक वाक्य तयार झाले. परंतू न्यायमुर्ती भूषण गवई यांनी हे वाक्य म्हणले नसून हा एक मोठा निर्णय आहे. यावर विचार करण्याची नक्कीच गरज आहे. पत्रकार पुन्यप्रसुन वाजपेयी, अभिसार शर्मा, अजित अंजुम, अशोक वानखेडे, दिपक शर्मा, उमाकांत लखेडा, संजय शर्मा, राजीव रंजनसिंह, रविशकुमार,आफरा खानम शेरवाणी, नवीनकुमार यांच्यासह असंख्य लोक या विश्लेषणात लागले आहेत. सोबतच चित्रा त्रिपाठीसारख्या मी देशासाठी आहे असे म्हणणाऱ्या अँकर सुध्दा अनेक कार्यक्रम घेत आहेत. विषय एकच आहे. नेपाळसारखे भारतात घडू शकते किंवा नाही. म्हणजे वत्कृत्व स्पर्धेमध्ये एकाच विषयावर सकारात्मक आणि नकारात्मक बोलण्याचा हा प्रकार आहे.
भाजपचे खा.निशिकांत दुबे स्वत: सांगतात भिती वाटत आहे. म्हणजे नक्कीच काही तरी चुकत आहे. चुकतच नसेल तर भिती का वाटते. 2022 मध्ये श्रीलंकेत असाच विद्रोह झाला. 2024 मध्ये बांग्लादेशात झाला आणि 2025 मध्ये नेपाळमध्ये झाला. याचे विश्लेषण करतांना काही जण सांगतात. दक्षीण आशिया (भारत-श्रीलंका-बांग्लादेश-पाकिस्तान-नेपाळ-भुटाण-मालदिव) च्या भागामध्ये आर्थिक असमानता भरपूर आहे. बेरोजगारी सिमेच्यावर गेली आहे आणि बेरोजगारीमुळे त्रासलेल्या युवकांचा क्रोध हिंसेत बदलला की, तो अशा प्रकारचा विद्रोह किंवा आक्रोशात बदलतो. अमेरिका दक्षीण आशियाच्या जिओ पॉलिटिकल बदलावर प्रभाव पाडून आपले वर्चस्व तयार करण्यात मग्न आहे. कारण त्यांना चिनला आव्हान द्यायचे आहे. असा विद्रोह होतो तेंव्हा तेथील नागरीकांना असे लक्षात येते की, काही लोकांच्या जिवनमानाचे उंच होणे सतत सुरू आहे आणि आम्ही आहे तेथेच आहोत. किंवा त्यापेक्षा खाली जात आहोत. तेंव्हा त्यांच्या मनात हा आक्रोश तयार होतो आणि तो दिशादर्शक असला तर बांग्लादेश, श्रीलंका आणि नेपाळमध्ये घडले तसे घडते. या आक्रोशाला दिशा नसेल तर काही दिवस हिंसा घडते आणि आक्रोश शांत होत असते.
लिबियामध्ये महम्मद गदाफी नावाचे तानाशाह झाले. 1969 ते 2011 असा सर्वात मोठा 42 वर्षाचा कालखंड त्यांनी सत्ता चालविली. परंतू 2011 मध्ये त्यांना जनतेने मारुन टाकले. सिरियामधील बशर असद हे सन 2000 ते 2024 पर्यंत एकल शासक होते. यमनचे शासक सलेह 1978 ते 2011 सत्तेवर होते.ट्युनिशिया येथील बेनली यांना तर जनतेने बेहाल केले. या बेनलीच्या शासनामध्ये एका भाजीविक्रेत्याने सार्वजनिक ठिकाणी आत्मदहन केले होते आणि या आत्मदहनाचे व्हिडीओ सामाजिक संकेतस्थळांवर व्हायरल झाले आणि त्यातून तेथे उद्रेक, आक्रोश, जनआंदोलन झाले होते. इजिप्तचे शासक हुस्नेमुबारक 1981 ते 2012 या कालखंडात तानाशाह राहिले. पाकिस्तानमध्ये जियाउलहक्क यांनी 1973 ते 1989 अशा लांब कालखंडात शासन चालविले. पण अखेर त्यांचा अंत झालाच. कोणत्याही हिटलर शाहचा अंत असाच होत असतो. कालखंडाला वेळ लागतो. आक्रोश तयार होण्यासाठी लागणारी परिस्थिती उशीरा मिळते आणि तो आक्रोश अत्यंत संघटीत पध्दतीने पुढे नेण्यामध्ये योग्य दिशा नसते. त्यामुळे आंदोलनास उशीर होतो.
पत्रकार अशोक वानखेडे याबद्दल सांगतात की, नागपूर जवळच्या गावात राहणारा एक व्यक्ती आपल्या गाडीत प्रवाशांना बसविण्यासाठी नागपूर-नागपूर अशी ओरड करणारा व्यक्ती पुढे नेता होतो, मंत्री होतो आणि त्याची मुले चार चाकी वाहनाने नागरीकांना चिरडतात. ही ती परिस्थिती आहे. ज्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनात जनआक्रोश तयार होतो आणि त्याचा परिणाम नेपाळसारखा होतो. पत्रकार राजीव रंजनसिंह सांगतात. भारतात असे घडण्यामध्ये अडचण आहे. कारण आजच्या परिस्थिती केंद्र सरकार 80 कोटी लोकांना अन्नधान्य मोफत देत आहे. जवळपास 90 कोटी लोका शासनाचे लाभार्थी आहेत. राज्य शासनाच्यावतीने जवळपास 4 लाख कोटी रुपये दरवर्षी अनुदान म्हणून वाटप होतात. अर्थसंकल्पाचा 10 टक्के निधी अनुदानावर खर्च होतो. मग भारतात नेपाळसारखा जनआक्रोश तयार होणे अवघड आहे.
राजीवरंजनसिंह सांगतात कॉंगे्रस संविधान आणि लोकशाहीचा आदर करते. म्हणूनच त्यांनी अण्णा हजारे आंदोलन चालू दिले होते. त्यामुळे त्यांची सत्ता गेली. परंतू लोकशाहीवर प्रेम असल्यामुळे त्यांनी ते आंदोलन सुरू ठेवले. परंतू पुढे असेच एक आंदोलन बाबा रामदेव यांनी चिल्लीत सुरू केले होते. त्यात सरकारची आणि रामदेव बाबांची आपसात बोलणी झाली होती की, विहित कालखंडापर्यंत मला आंदोलन करू द्या. पण ते आंदोलन विहित कालखंडानंतर पण सुरू राहिले आणि म्हणून त्या वेळच्या शासनाने लाठीहल्ला करून त्यावेळी ते आंदोलन मोडून काढले. त्यावेळी आंदोलन करणारे अण्णा हजारे, बाबा रामदेव, श्रीश्री रविशंकर आज कोठे आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, ते आंदोलन भारतीय जनता पार्टीशी जोडलेले होते.
सत्तेला कोणी प्रश्न विचारेल तर तो किती चुकीचा आहे किंवा त्यामध्ये किती कमतरता आहे याचा कांगावा करण्यात सरकारही मजबुत आहे आणि गोदी मिडीया त्यापेक्षा मजबुत आहे. म्हणजे अत्यंत जुनी पध्दत जी सुकरार आणि ब्लुटो यांच्या काळात होती. त्याला किल द मॅसेंजर असे म्हणतात. ती सरकार अंमलात आणते आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी प्रश्न विचारणाऱ्यांलाच दोषी ठरवते. हाच तर चेहरा आणि चरित्र भारतीय जनता पार्टीचे आहे.
सुरेंद्र राजपूत या कॉंगे्रस प्रवक्त्याला चित्रा त्रिपाटी नावाची अँकर चर्चेत स्वत: पहिल्यांदा म्हणाली की, तुम्हाला लाज वाटते काय? यावर सुरेंद्र राजपूत पण उखडले आणि त्यांनी चित्रा त्रिपाटींचे भरपूर धडे वाचले. तेंव्हा चित्रा त्रिपाटी महिला या नावाखाली आली आणि महिला अँकरसोबत तुम्ही असे बोलू शकत नाही असे म्हणाली. तुम्ही ओंजळभर पाण्यात बुडून मरा असे सांगितले. याचेही उत्तर सुरेंद्र त्रिपाटील यांनी भरपूर मोठे दिले. नॅशनल चॅनल, नॅशनल चॅनल असे ओरडून आपला रुबाब दाखवत होती. नेपाळमध्ये घडलेल्या घटनांविषयी ही चर्चा सुरू होती. मोहनप्रकाश यांनी भारत सरकारला सुध्दा नेपाळच्या घटनानंतर दक्ष राहण्यास सांगितले आहे.
नेपाळमध्ये तर परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. एका माजी पंतप्रधानाच्या पत्नीला हिंसक जमावाने जिवंत जाळून टाकले आहे. पंतप्रधान सेनेच्या ताब्यात आहेत. इतरांचे काय विचारतात. पण त्यांनी सुध्दा हा विचार करावा लागेल की, आमची जनता आमच्या विरुध्द का झाली. तर त्यांनी तोच प्रकार पाहिला की, आमच्या मुलांना काय मिळाले. आमचे जीवनमान आहे तसेच आहे. परंतु इतरांची मुले, विशेष करून नेत्यांची मुले कशी माजली आहेत आणि त्यातूनच हा जनआक्रोश घडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!