नांदेड(प्रतिनिधी)-सात वर्षापासून घरसोडून गेलेल्या व्यक्तीला नांदेड पोलीसांनी शोधल्यानंतर आपल्या माघारी जन्मलेल्या मुलीला पाहिल्यानंतर त्याच्या डोळ्यातून आश्रु वाहायला लागले. पण सात वर्षानंतर एका मिसींग प्रकरणाचा शोध लागला आहे.
दि.17 मे 2019 रोजी शारदानगर येथील गणेश संभाजी भारसावडे यांनी दिलेल्या खबरीनुसार 5 नोव्हेंबर 2018 रोजी शारदानगरमधून त्यांचा मुलगा नवनाथ गणेश भारसावडे (26) हा लग्न झाल्यानंतर तीन महिन्यांनी, ज्यावेळी त्याची पत्नी तिन महिन्याची गरोदर होती. त्यावेळी मी मुलाखतीला जात आहे म्हणून घरातून निघून गेला तो आलाच नाही. या संदर्भाने विमानतळ पोलीस ठाण्यात मिसींग क्रमांक 16/2019 दाखल होता. या गुन्ह्याचा तपास सध्या पोलीस अंमलदार जावेद यांच्याकडे आहे.
पोलीसांचे गुप्त माहितीदार आणि सायबर सेलच्या मदतीने याचा शोध सुरू होता. तेंव्हा त्यांना सात वर्षापुर्वी घरातून गेलेल्या नवनाथ भारसावडेचा शोध पनवेल, नवी मुंबई येथे सापडला. पोलीस पथक तेथे गेले आणि त्याला घेवून नांदेडला आले. आई-वडील, पत्नी आणि मुलगी यांना पाहुन त्याच्या डोळ्यात आश्रु वाहू लागले.
ही कार्यवाही पोलीस निरिक्षक चितांबर कामठेकर, सायबर सेलचे पोलीस निरिक्षक वसंत सप्रे, पोलीस अंमलदार जावेद, राजू कांबळे, राजेश माने, शेख शोयब, पाकलवाड, वाडकर, नंदगावे, टीमके, दिपक ओढणे, रेश्मा पठाण यांनी केली.
सात वर्षापासून गायब असलेला युवक नांदेड पोलीसांनी शोधला
