हदगाव (प्रतिनिधी)-खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या सुविद्य पत्नी सौ सुषमाताई नागेश पाटील आष्टीकर यांचे मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये दिनांक. 10 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्यावर उद्या दि.11 रोज गुरूवारी त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मृत्यू समयी त्यांचे वय 51 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा व एक मुलगी, सुन, नातवंड असा परिवार आहे. त्या एक सुसंस्कृत महिला म्हणून समाजामध्ये ओळखल्या जात होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र पसरताच अनेकांना धक्काच बसला व हिंगोली लोकसभा मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यातीलही शिवसैनिकांवर व मतदार संघातील अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यावर व नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली.
उद्या दिनांक 11 रोजी त्यांच्या राहत्या मूळ गावी आष्टी तालुका हदगाव या ठिकाणी त्यांच्यावर सकाळी 10 वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती पाटील कुटुंबीयांकडून देण्यात आली.
खा.नागेश पा.आष्टीकर यांच्या पत्नीचे निधन
