नांदेड(प्रतिनिधी)-26 लाख 48 हजार 700 रुपयांचे सोन्याचे दागिणे घेवून पश्चिम बंगालमधील एक व्यक्ती पळून गेला आहे.
शेख आबु तालेब शेख अहमद अली मुळ रा.पश्चिम बंगाल राज्य सध्या मंडई इतवारा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी 3 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 वाजेच्यासुमारास उद्योगभवन कामगार कार्यालय शिवाजीनगर येथे आमिन हुसेन मल्लीक इच्छा मल्लीक रा.पश्चिम बंगाल राज्य ह.मु.मन्यार गल्ली नांदेड यास 26 लाख 48 हजार 700 रुपयांचे सोन्याचे दागिणे बनवून विश्र्वासाने विक्री करण्यासाठी दिले असतांना आमिन हुसेन सोन्याचे दागिणे घेवून फरार झालेला आहे. या प्रकरणी इतवारा पोलीसांनी गुन्हा क्रमांक 286/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा शाखेत नाव कमवून आलेल्या नामवंत, किर्तीवंत आणि यशवंत पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर ठाणुसिंग चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे.
24 लाख 48 हजार 700 रुपयांच्या फसवणुक गुन्ह्याचा तपास किर्तीवंत पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर चव्हाण करणार
