नांदेड(प्रतिनिधी)- महानगरपालिका निवडणुकीची तयारी निवडणुक विभागाने सुरू केली. यात आता नवीन प्रभाग रचना तयार केली जाणार असून या रचनेबाबत काही आक्षेप असतील तर लेखी स्वरुपात दाखल करावे असे जाहीर केल्यानंतर सोमवारी दोन आक्षेप दाखल करण्यात आले आहेत.
आगामी काळात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. यातील दोन प्रभागावर सोमवारी 2 आक्षेप दाखल झाले आहेत. यात 1 कॉंग्रेसचे माजी नगरसेवक मुन्तजीब यांनी तर दुसरा आक्षेप जनता पॅथर या संघटनेकडून दाखल झाला आहे. महानगर पालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या मान्यतेने प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. यावर आक्षेप मागवण्यात आले आहेत, सोमवारी मनपाच्या प्रभाग क्रमांक 7 च्या रचनेवर माजी नगरसेवक मुन्तजीबोद्दीन यांनी आक्षेप घेतला आहे.
यात प्रभाग 7 चे नाव जयभीम नगर ठेवण्यात आले आहे. यात मगदूम नगरचा उल्लेख टाळण्यात आला आहे, तो उल्लेख करावा अशी मागणी केली आहे. तर दुसरा आक्षेप जनता पॅथरने घेतला असून मनपाची ही प्रभाग रचना अन्यायकारक असल्याचे नमूद केले आहे.
महानगरपालिका हद्दीत एकूण 20 प्रभाग असून या प्रभाग रचनेच्या आक्षेपाबद्दल नागरीकांनी महानगरपालिकेत येवून लेखी स्वरुपात आपला आक्षेप नोंदवावा याबाबत पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी दोन आक्षेप दाखल झाले असून या आक्षेपावर अद्यापही सुनावणी झाली नाही.
महापालिका प्रभाग रचनेवर सोमवारी दोन आक्षेप दाखल
