नांदेड(प्रतिनिधी)-मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलादुन्नबी या या उत्सवाच्या संबंधांची मिरवणूक 5 सप्टेंबर ऐवजी 8 सप्टेंबर रोजी काढण्यासाठी मान्यता दिली. कारण 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होते. म्हणून असे घडले. उद्या दि.8 सप्टेंबर रोजी ही मिरवणूक निघणार आहे. त्यासाठी पोलीस अधिक्षकांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 नुसार अधिसुचना जारी केली आहे.
या अधिसुचनेनुसार उद्या सकाळी 6 वाजेपासून दुपारी 4 वाजेपर्यंतचा शहरातील प्रवास नागरीकांनी अधिसुचनेनुसार करावा. कारण शहरातील बरेच मार्ग बंद राहतील. आणि त्या बंध मार्गांसाठी पर्यायी मार्गावरून वळण घेवून आपला प्रवास पुर्ण करावा लागेल.
वाहतुकी करीता बंद असलेले मार्ग
हबीब टॉकीज-जुना मोंढा-देना बँक चौक-महाविर चौक-जिल्हाधिकारी कार्यालय-छत्रपती श्री. शिवाजी महाराज पुतळा-वजिराबाद चौक-कलामंदिर-शिवाजीनगर-आयटीआय चौक-श्रीनगर-वर्कशॉप कॉर्नर हा मार्ग जाण्या-येण्यासाठी पुर्णतः बंद राहिल.
वाहतुकीकरीता दिलेले पर्यायी मार्ग
जुना मोंढा-कौठा पोलीस चौकी-रविनगर-गोवर्धनघाट पुलावरून-तिरंगा चौक-पोलीस मुख्यालय मार्ग-पक्कीचाळ पोलीस चौकी-खडकपुरा-लालवाडी अंडरब्रिज-शिवाजीनगर-पिवळीगिरी-गणेशनगर वाय पॉईंट ते पुढील मार्ग वाहतुक येणे आणि जाण्यासाठी सुरू राहील. महाविर चौक-वजिराबाद- चौक-तिरंगा चौक हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू राहिल. राजकॉर्नर-वर्कशॉप कॉर्नर-भाग्यनगर-आनंदनगर-कै.वसंतराव नाईक चौक- विरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह चौक-बाफना हा मार्ग वाहतुकीसाठी चालू राहिल. गांधी पुतळा-चिखलवाडी कॉर्नर-यात्रीनिवास-हिंगोली गेट-साठे चौक-श्रीनगर हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू राहिल.
नांदेडच्या जनतेने 8 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेदरम्यान वाहतुकीस बंद असलेले मार्ग वगळून वाहतुकीसाठी सुरू असलेले मार्ग वापरून आपला प्रवास पुर्ण करावा अशी अधिसुचना नांदेड पोलीस अधिक्षकांनी प्रसिध्द केली आहे.
