नांदेड(प्रतिनिधी)-1980 पासून इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणाची लढाई सुरू असून महाराष्ट्र शासनाने काल काढलेला जीआर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय फायदा घेण्यासाठी काढला आहे असे ओबीसी नेेते तथा तहरीक-ए-औकाफचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी सांगितले.
आम्ही सर्व प्रथम शरद पवार यांना समजून सांगितले होते की, जात आणि वर्ग हा वेगळा विषय आहे आणि त्या पध्दतीनुसार इतर मागास प्रवर्गाच्या बांधवांना आरक्षण मिळायला हवे. पण आजपर्यंत त्याचे काही झाले नाही. आता शासनाने 1 सप्टेंबर रोजी मराठा जातीच्या लोकांना कुणबी जातीत आणण्यासाठी जो शासन निर्णय जाहीर केेलेला आहे. त्यात काही दम नाही. कारण असे अनेक जीआर निघातात. पण अंमलात कोणते येतात. सध्याच्या परिस्थितीत सुध्दा ओबीसी प्रवर्गाला काही धक्का लागणार नाही. 4 टक्के नोकऱ्या सुध्दा ओबीसींकडे नाहीत. याही पुढे शब्बीर अन्सारी म्हणाले. शासनाकडे नोकऱ्याच नाही ते काय देणार. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला फायदा मिळावा म्हणून केलेला हा खेळ आहे असे शब्बीर अन्सारी म्हणाले.
मराठा समाजासाठी काढलेला जीआर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीचे राजकारण-ओबीसी नेते शब्बीर अन्सारी
