पुणे येथे ६ सप्टेंबरला अंत्यसंस्कार
हिंगोली– हिंगोलीचे भूमिपुत्र व उच्च न्यायालयाचे सेवानिवृत न्यायमूर्ती आणि गुंडेवार आयोगाचे प्रमुख सुधाकरराव गुंडेवार ह्यांचं पुणे येथे ४ सप्टेंबरला हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झालं.मृत्युसमयी त्याचं वय ८५ वर्ष होते.त्यांची अंत्य यात्रा ६ सप्टेंबर २०२५ला फाइव्ह गार्डन सोसायटी,जगताप डेअरी जवळ, काळे वाडी फाटा पिंपळे सौदागर येथून सकाळी ११ वाजता काढण्यात येणार असून पवनमई वैकुंठ धाम पिंपळे गुरव पुणे येथे अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती त्यांचे पुतणे राजकुमार गुंडेवार ह्यांनी हिंगोली येथे दिली. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले रुपेश व राहुल ,सुना,नातू ,एक भाऊ सात बहिणी आदी मोठा परीवार आहे.त्यांचे चिरंजीव राहुल हे अमेरिकेत असून ते पुणे येथे आल्यानंतरच अंत्य संस्कार ६ सप्टेंबरला होणार आहेत. राज्यातील आर्यवैश्य समाजातील ह्या पदावर सेवारत झालेले ते पहिले न्यायमूर्ती होत.त्यांच्या निधनाची वार्ता कळताच त्यांच्या परिवारातील व आप्तेष्टांनी सर्व प्रतिष्ठान बंद करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.तत्कालीन खासदार कै. विलासराव गुंडेवार ह्यांचे ते चुलत भाऊ होते.त्यांच्या निधना बद्दल हिंगोली येथील आर्यवैश्य समाज,आर्य वैश्य महासभा,आर्य वैश्य युथ,महाराष्ट्र राज्य आर्य वैश्य महासभा,व बांधकाम समिती,हिंगोली जिल्ह्यातील वकील मंडळी,महाराष्ट्र राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण संघाचे राज्य कार्याध्यक्ष पत्रकार डॉ विजय निलावार आदींनी त्यांच्या आत्म्यास चीर शांती लाभो अशी प्रार्थना करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
