भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

*प्रलंबित अर्जासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ*

नांदेड:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. तरी जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित/ विनाअनुदानीत/कायम विनाअनुदानीत महाविद्यालयात सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती विद्यार्थ्यांनी शिष्यवृतीचे नवीन व नूतनीकरण अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन महाडिबीटी पोर्टल 30 जून 2025 पासून सुरु झालेले आहे. तरी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांमध्ये या योजनांबाबत जनजागृती करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

 

तसेच महाविद्यालयाच्या स्तरावर असलेले शैक्षणिक वर्ष सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील प्रलंबित अर्जाची तारीख 30 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील अर्जाची छाननी करून पात्र अर्ज कार्यालय स्तरावर मंजुरीसाठी लवकरात लवकर पाठवावे जेणेकरून विद्यार्थ्याना पुढील शैक्षणिक वर्षाचा अर्ज भरण्यास मदत होईल. त्रुटीतील अर्ज विद्यार्थ्यांच्या स्तरावर परत पाठवून त्रुटी पूर्तता करून घ्यावी, जेणेकरून विद्यार्थ्याना लाभ देणे सोयीचे होईल. तरी जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित/ विनाअनुदानीत/कायम विनाअनुदानीत महाविद्यालयात समाज कल्याण कार्यालयाने यांची नोंद घ्यावी असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!