मराठा आरक्षण संदर्भाने काढलेल्या शासन निर्णयाची भोकरमध्ये ओबीसी समाजाने केली होळी

नांदेड(प्रतिनिधी)-मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत सरकारने दोन वेगवेगळे शासन निर्णय जारी केले. याचा विरोध ओबीसी बांधवांनी राज्यभर सुरू केला. नांदेडमध्ये सुध्दा भोकर तहसील कार्यालयासमोर ओबीसी बांधवांनी घोषणाबाजी करून शासनाच्या निर्णयाची होळी केली.
मुंबईमध्ये सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन काहीशा यशासह संपले. त्यात अनेक जण आप-आपल्या बुध्दीप्रमाणे शासनाने काढलेल्या शासन निर्णयांचे विश्लेषण करून सांगत आहेत. परंतू कुणबी या जातीचे प्रमाणपत्र निर्गमित झाल्यानंतर त्याचा सर्वात मोठा फटका ओबीसी समाजाला समाजाला बसणार आहे. कारण ओबसी हा जाती संवर्ग ओबीसी या आरक्षण प्रवर्गात समाविष्ट केलेला आहे.

Oplus_16908288

शासनाने आपले निर्णय जाहीर केल्यानंतर ओबीसी समाजाच्यावतीने याचा विरोध राज्यभर होत आहे. त्याच नांदेड जिल्ह्यातील भोकर तहसील कार्यालयासमोर ओबीसी बांधवांनी घोषणाबाजी करून शासनाने काढलेल्या जीआरची होळी केली. शासनाने आपला निर्णय रद्द करावा आणि ते न केल्यास संपुर्ण महाराष्ट्रभर तिव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन भोकर तहसीलदारांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे. या निवेदनावर नागोराव शेंडगे (बापु), डॉ.यु.वाय.जाधव, डी.आर.पांचाळ, माधव करेवाड, आप्पाराव राठोड, सतिश चव्हाण, राजेश करपे, सुरेश बिठेवाड, मारोती मलमतलेपवार, श्रीनिवास लामगे, सदाशिव शेंडगे, प्रल्हाद हामंद, खंडेराव शेंडगे, सुभाष बांडरे, माधव हामंत, संतोष नव्हाते, विजयकुमार कोगेवार, नारायण शेंडगे, साईनाथ लांबगे, चंद्रकांत हामंद, शिवकुरूकवाड, पंचफुलाबाई करपे, लक्ष्मण शेंडगे, साईप्रसाद खांडरे, पवन धात्रक, सुर्यकांत हामंद, बालाजी कुरूपवाड, राहुल धात्रक, दिगांबर गोरापुरे, चंद्रकांत मुस्तापुरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

व्हिडिओ….

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!