नांदेड(प्रतिनिधी)-मौजे चिकाळा ता.मुदखेड येथील एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 23 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
चिकाळा येथील उदय देवराय देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 31 ऑगस्टच्या रात्री 11 ते 1 सप्टेंबरच्या पहाटे 8 वाजेदरम्यान त्यांच्या घराचे गेटचे लॉक तोडून कोणी तरी चोरट्यांनी कपाटात ठेवलेले रोख रक्कम, सोन्याचे दागिणे असा एकूण 2 लाख 33 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. मुदखेड पोलीसांनी या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 152/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक पाटील हे करीत आहेत.
चिकाळा गावात 2 लाख 23 हजारांची चोरी
