नांदेड(प्रतिनिधी)-एक विधीसंघर्षग्रस्त बालकासह चार चोरटे एक म्हैस चोरुन घेवून जात असतांना उस्माननगर पोलीसांनी पकडले आहे.
तानाजी शेषराव शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे लाडका ता.कंधार येथे चार जण त्यांची म्हैस चोरी करून घेवून जात असतांना त्यांना पकडले. ही घटना 30 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 वाजता घडली. म्हैस चोरून नेणारे लवकुश नामदेव राठोड (25) रा.शिराढोण, सतिश राजाराम ढाले (29) रा.गोळेगाव, राजू भगवान लांडगे(30) रा. सावरगाव आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक उस्माननगर पोलीसांनी या चौघांविरुध्द गुन्हा क्रमांक 224/2025 दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार कुबडे हे करीत आहेत.
उस्माननगर पोलिसांनी चार जणांना म्हैस चोरताना पकडले
