नांदेड : –महाकवी वामनदादा कर्डक व प्रतापसिंग बोधडे यांच्या संयुक्त जयंती निमित्त नुकताच डॉ.शंकराव चव्हाण पेक्षा गृह येथे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा अखिल महाराष्ट् सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रभू सावंत आमदुरेकर यांना त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल महाकवी वामनदादा कर्डक जीवन गौरव तुफानातील दिवे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते सह पत्नीक प्रदान करण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संजय निवडुंगे आयोजित महाकवी वामनदादा कर्डक व प्रताप सिंग बोधडे यांचा संयुक्त जयंती सोहळा मोठ्या हर्ष उल्हासात संपन्न होतो याही वर्षी महाराष्ट्रातील अनेक दिग्गज कलावंत मंडळी यांच्या उपस्थिती हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पडला कार्यक्रमाच्या अनुषंगाने समाजातील विविध क्षेत्रातील आपल्या कार्याने भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांचे तुफानातील दिवे हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष प्रभू सावंत आमदुरेकर यांना सह पत्नीक मानपत्र सन्मान चिन्ह देऊन तूफानातील दिवे हा पुरस्कार कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष इंजि.प्रशांत हिगोले प्रल्हाद शिंदे यांचे सुपुत्र ज्येष्ठ गायक चंद्रकांत शिंदे धडाडीचे सामाजिक युवा कार्यकर्ते व उद्योजक रवींद्र सोनकांबळे मायाभाऊ नादेडकर मेजर साहेबराव चौदते, वनराव कावळे,विशाल वाघमारे, संतोष वाठोरे, कनिष्क सोनाळे,गंगाधर वडणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला आहे प्रभू सावंत आमदुरेकर यांचे सामाजीक धार्मिक शैक्षैनिक व सांस्कृतीक कार्य समाज उपयोगी व उल्लेखनीय आहे त्याच कार्याचा गौरव करून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे कार्यक्रमाचे आयोजन संजय निवडुंगे यांनी केले असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य विकास कदम व प्रा.अविनाश नाईक यांनी केले आहे.
