अर्धापूर( प्रतिनिधी )–अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ शेख मोहम्मद वखियोद्दीन यांनी मराठवाड्यातून प्रथमच शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान ‘राष्ट्रपती पुरस्कार’प्राप्त करून ऐतिहासिक यश संपादन केले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे अर्धापूर तालुका तसेच संपूर्ण नांदेड जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.
डॉ शेख मोहम्मद वखियोद्दीन यांनी गेली अनेक वर्षे शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अथक परिश्रम घेतले. शाळेमध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक उन्नतीसोबतच सामाजिक जाणिवा विकसित करण्यावर त्यांनी विशेष भर दिला !
यांना महाराष्ट्र राज्यातून प्राप्त झाला आहे, भारत देशातील शिक्षक संवर्गातून केवळ ५० शिक्षकांना हा अत्यंत मानाचा पुरस्कार देशाच्या महामाहीम राष्ट्रपती यांच्या हस्ते ०५-सप्टेंबर २०२५ रोजी दिला जाणार आहे. डॉ. शेख सरांना २०१३-१४ मध्ये नांदेड जिल्हा शिक्षक पुरस्कार, २०१७-१८ मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे, डॉ. शेख सर, २०१४ पासून बालभारती येथे पाठ्यपुस्तक मंडळावर “विज्ञान, जलसुरक्षा, शिक्षणशास्त्र” ह्या विषयाकरिता अभ्यासगट सदस्य पदी इयत्ता सहावी-बारावी साठी कार्यरत होते, अनेक सामाजीक व शैक्षणिक उपक्रम सरांनी यशस्वीरित्या पुर्णत्वास नेले आहेत. सर नांदेड जिल्हा शिक्षण मंडाळाचे विदयमान संचालक आहेत, तथापी “टाईड्स” शिक्षक संघटना, महा.रा. अल्पसंख्यांक शिक्षक कर्मचारी संघटनेचे संस्थापक आहेत, सरांचा माध्यमिक शिक्षक म्हणून २८ वर्षांचा प्रदिर्घ अनुभव आहे !
अर्धापूर तालुक्यातील शिक्षकवर्ग, पालकवर्ग व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गावोगावी डॉ शेख मोहम्मद वखियोद्दीन यांच्या कार्याचा गौरव करण्यात येत असून स्थानिक लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे.
