नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील डॉ.आंबेडकरनगरमध्ये अवैध दारु विक्री व्यवसाय सुरू असल्याबाबत पोलीस निरिक्षक शिवाजीनगर यांना सचिन वायवळे यांनी अर्ज दिला आहे.
सचिन नंदकुमार वायवळे यांनी दिलेल्या अर्जानुसार डॉ.आंबेडकरनगरमधील त्रिरत्न बुध्द विहाराजवळ राजू आनंद महादळे हा युवक त्याच्या एम.एम.किराणा या दुकानावर देशी दारु विक्री करत आहे. त्यामुळे विहाराच्या परिसरात राहणाऱ्या धार्मिक लोकांना आणि लहान मुलांना त्रास होत आहे. विहाराजवळ बसून दारुपिणाऱ्यांमुळे नागरीक त्रासले आहेत. सकाळी 4 वाजल्यापासून हा दारु विक्रीचा व्यवसाय सुरू होता आणि रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहतो. पोलीस निरिक्षकांनी या चुकीच्या कामावर कायदेशीर कार्यवाही करावी अशी अपेक्षा या अर्जात करण्यात आली आहे.
विहार परिसरात अवैध दारु विक्री बंद करा-मागणी
