नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीसांनी पहाटेच्या वेळेस भाजीपाला व दुधविक्रेत्या लोकांना खंजीरच्या धाकावर लुटणाऱ्या दोन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून 1 लाख 40 हजार रुपयांचा चोरीचा ऐवज जप्त केला आहे. या दोन चोरट्यांच्या पकडण्यामुळे भाग्यनगर पोलीस ठाण्यातील दोन, लिंबगाव आणि बारड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे 4 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपअधिक्षक रामेश्र्वर व्यंंजने, भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, गुन्हे शोध पथकााचे पोलीस उपनिरिक्षक नरेश वाडेवाले, पोलीस अंमलदार विशाल माळवे, गंगाधर किडे, निवृत्ती घुले, आदनान पठाण, व्यंकट गंगुलवार, सायबर सेलचे दिपक ओढणे यांनी गुप्त माहितीच्या आधारावर रवि देविदास दुधमल (18) रा.नवीन वाडी नांदेड, सय्यद मुस्ताक सय्यद इसाक (21) रा.आसरानगर नांदेड या दोघांना पकडले. या दोघांनी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन आणि लिंबगाव, बारड पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक अशा चार वेळेस पहाटेच्या वेळेत भाजीपाला विक्रेते आणि दुध विक्रेत्यांना खंजीरचा धाक दाखवून लुटले आहे. पोलीसांनी त्या दोघांकडून 1 दुचाकी, 3 हजार रुपये रोख, एक मोबाईल आणि एक खंजीर असा 1 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भाग्यनगर पोलीसांनी दोन चोरटे पकडले 4 गुन्हे उघड
