नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीसांनी 26 ऑगस्ट रोजी 11 वाजेच्यासुमारास धनेगाव पेट्रोल पंपासमोर अवैध वाळू वाहतुक करणारा टिप्पर पकडला आहे. 14 लाखांचा टिप्पर आणि 15 हजारांची वाळू असा 14 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आपले पोलीस अंमलदार आसिफ अली अजगर अली शेख, शेख इब्राहिम, शेख जमीर, धम्मपाल कांबळे यांना नांदेड देगलूर रस्त्यावरील पेट्रोल पंप धनेगाव येथे पाठविले. त्या ठिकाणी पोलीसांनी एम.एच.26 ए.डी.0917 क्रमांकाचा टिपर तपासला त्यामध्ये 3 ब्रास वाळू भरलेली होती. वाळूची कागदपत्रे नव्हती. आणि परवाना सुध्दा नव्हता. तेंव्हा पोलीसांनी या प्रकरणी आसिफ अली अजगर अली या ंच्या तक्रारीवरुन टिपरचालक साईनाथ रामचंद्र करडीले (25) रा.नागापूर ता.जि.नांदेड याच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 825/2025 दाखल केला आहे. या घटनेत 14 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळूचा टिपर पकडला
